इंदापूर: इंदापूर तालुक्यात वाळू माफियांनी एका किराणा दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर गावात ही घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दत्तात्रय बबन कोळी (वय ४० वर्ष रा.नरसिंहपूर ता.इंदापूर ) यांचे नीरा नरसिंहपूर गावात किराणा मालाचा छोटासा व्यवसाय आहे. त्यांच्या घरासमोरुन पुर्व-पश्चिम मार्गाने गावातील भिमा नदीच्या पात्रातून वाळू वाहतूक केली जाते. सोमवार ६ जानेवारी रोजी आम्ही रात्री १० वा.च्या सुमारास काळे कुटुंबीय जेवन करुन झोपले असता दि.७ जानेवारी रोजी पहाटे ४.०० वा.च्या सुमारास काळे यांच्या घराजवळ असलेल्या एमएससीबीच्या खांबावर कुठले तरी वाहन धडकून स्फोट झाला.त्याबर काळे पती पत्नी ने घराबाहेर येऊन पाहिले असता, त्यांच्या गावातील अरुण पमा मोरे याचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच २३ बी ८०३७ व त्यास वाळूने भरलेली ट्राॅली क्रमांक एम एच ११ आर २३८५ ही होती. त्याच ठिकाणी अक्षय संजय गोडसे, योगेश संजय गोडसे, संजय रामदास गोडसे व इतर तिघेजण नांव व
पत्ता माहीत नाही. हे ट्रॅक्टर खांबापासुन बाजुला काढत असताना काळे यांनी त्यांना घरातूनच आवाज दिला की आमची लाईट घालवली का?, त्यावर त्या वाळू माफियांनी माझी दुचाकी फोडून टाका असावं म्हणत तलवारी, लोखंडी गज जंब्या घेऊन मारहाण करू लागले. तुम्ही आमच्याशी सारखेच भांडण का करता असे त्यांना विचारले असता, त्यातील योगेश गोडसे याने तलवारीच्या उलट्या बाजूने हाताला दुखापत केली, तसेच काळे यांची पत्नी यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच तिच्या तोंडावर तलवारीच्या उलट्या बाजूने मारहाण केली. त्या मारहाणीत तिच्या दाताला जखम झाली आहे.याशिवाय त्यांनी पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गणठनही घेऊन गेले आहेत.
घरात हा ओरकर घडत असताना वृद्ध आई सुभद्रा बबन कोळी (वय ७५) ही मारू नका म्हणून मध्ये पडली तर तिलाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. व जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना घडल्यानंतर कोळी यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांना वाळू चोरून नेत असल्याची माहिती दिली.त्यानंतर म्हसुलचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला. काळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. काळे यांच्या पत्नीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ए. एम.काझी करीत आहेत.