जालन्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, ३० तारखेला जालन्यातून सुटणार ‘वंदे भारत एक्स्प्रेस’

जालना २९ डिसेंबर २०२३ : जालन्यात वंदे भारत एक्स्प्रेसचे आगमन झाले असून लवकरच जालना मुंबई ही रेल्वे धावणार आहे. ३० डिसेंबर रोजी या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी देखिल सुरू झाली असून केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे व जिल्ह्यातील सर्वच आमदारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या गाडीला हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन यांनी देखील जालना रेल्वे स्थानकाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतलाय. जालन्याहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे होणार असून शेतकरी आणि व्यावसायिक यांच्या साठी फायदेशीर होणार आहे. दरम्यान जालण्यातून वंदे भारत रेल्वे गाडी सुरू होणार असल्याने जालना जिल्ह्याच्या विकासात देखील मदत होणार आहे.

३० डिसेंबर रोजी जालना मुंबई वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली जाणार असून या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूर-दृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा