गोल पोस्ट महाराष्ट्र रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! स्लीपर वंदे भारतचा मुहूर्त ठरला; कधी होणार सुरु?

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! स्लीपर वंदे भारतचा मुहूर्त ठरला; कधी होणार सुरु?

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर गाड्या म्हणजेच शयनयान रेल्वे सुरू होण्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की, या गाड्या १५ ऑक्टोबर २०२५ नंतरच सुरू होणार आहेत.

वैष्णव म्हणाले की, “दुसरी गाडी नियमित सेवेसाठी तयार झाल्यावरच वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू करण्यात येतील.” सध्या दिल्लीतील शकुर बस्ती डेपोमध्ये पहिल्या गाडीच्या आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. दुसरी गाडी १५ ऑक्टोबरपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दोन्ही गाड्या एकत्रच सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जातील.

रेल्वेमंत्र्यांच्या माहितीनुसार, नियमित सेवा अखंडित ठेवण्यासाठी दुसरा रेक तयार असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गाड्या सुरू करण्याचा निर्णय दुसरा रेक सज्ज झाल्यावरच घेतला जाणार आहे.

दरम्यान, वर्षअखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका लक्षात घेता, या वंदे भारत स्लीपर गाड्या नवी दिल्ली–पाटणा मार्गावर सुरू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version