मुंबई, १० सप्टेंबर २०२२ : तीन वर्षापूर्वी उत्तर भारतात सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस या गाडीची चाचणी अहमदाबाद- मुंबई दरम्यान शुक्रवारी घेण्यात अली असून गाडीने ४९३ किलोमीटरचे अंतर सव्वा पाच तासात पार केले. या यशस्वी चाचणीमुळे ऑक्टोबर २०२२ नंतर ही गाडी पश्चिम रेल्वेवर प्रवाशांसाठी धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट पद्धतीचा हा रेक असून चार डब्यांचे चार संच आहेत ज्यात चार इंजिन असून गाडीचा स्पीड १३० ते १८० ताशी किलोमीटर असेल. या गाडीत विमानासारख्याच आरामदायी खुर्च्या आहे.
वंदे भारत एक्सप्रेस च्या सुधारित स्वदेशी रेक ची गाडी शुक्रवारी अहमदाबाद स्थानकातून सकाळी ७.६० वाजेता निघाली व मुंबई सेंट्रल स्थानकावर दुपारी १२.१९ वाजता पोहचली. साधारण मध्यंतरी लागणारे स्थानकावर थांबण्याची वेळ लक्षात घेता गाडीला हे अंतर कापण्यास सहा तासांच्या आसपासचा वेळ लागेल. दुपारी १ वाजून ९ मिनिटांनी या गाडीचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि संध्याकाळी ६ च्या सुमारास ही गाडी अहमदाबाद रेल्वे स्थानकात पोहोचली. या यशस्वी चाचणीनंतर मुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद होणार असून एकूण साडेपाच तासांत ही गाडी अंतर कापेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड