वणी येथील ‘सप्तश्रृंगी’च्या मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश बंद

31

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात आता गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्टकडून घेण्यात आला आहे.
आरती व पूजेच्या कालावधीत नोंदणी करुन आलेल्यांना गाभाऱ्यात दर्शन घेण्यास परवानगी दिली जाणार आहे. पुरुषांना सोवळे व महिलांना साडी नेसूनच गाभाऱ्यात जाऊन जावे लागेल, अशी अट ठेवली आहे. देवस्थानचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे देवस्थानच्या ट्रस्टचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश गणेश देशमुख यांनी दिली.
१जानेवारी २०२० पासून हा निर्णय लागू केला जाणार आहे. ट्रस्टच्या या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली गाभारा दर्शनाविषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा