गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे वानवडी पोलिसांकडून गांजा विक्रेत्यांना अटक!

वानवडी पोलिसांकडून गांजा विक्रेत्यांना अटक!

वानवडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३५ हजार रुपये किमतीचा १ किलो ७३५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. अविनाश श्रीरंग भोंडवे (४१) आणि संजय विश्वनाथ काथे (३५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हे दोघे रामटेकडी इंडस्ट्रियलजवळ गांजा विकण्यासाठी थांबले होते. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने पकडले. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. शहरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पाऊले उचलली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version