नंदुरबार २६ जुलै २०२२ : वापी-धुळे बसने राष्ट्रीय महामार्गवरील खड्डे चुकवण्याच्या नादात स्कूटरला धडक दिली. यात महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच पती जखमी झाला आहे.
ते धार्मिक कार्यक्रमासाठी आपल्या गावी जात होते. या दरम्यान मागून येणाऱ्या एम एच २०बीएल ३४२५ या बसने जोरदार धडक दिली. यात कल्पनाबाई शरद पाटील (वय ३३ ) या महिला जागीच मृत्यू झाला.
अपघातात स्कूटरच्या मागे बसलेली महिला बसच्या मागच्या टायरमध्ये आल्याने जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली. नवापूर पोलीस ठाण्यातील
निरीक्षक निलेश वाघ यांच्या पथकाने धाव घेत जखमींना मदत केली.
न्युज अनकट प्रतिनिधी: विजय सपकाळ