सध्या राज्यातील पोलिसांना कोरोना बरोबरच अनेक संकटांना सुध्दा सामोरे जावे लागत आहे. चक्रीवादळाची खबरदारी म्हणून मंगळवार पासूनच ते कार्यरत होते तर अनेक नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहनही करत होते. चक्रीवादळाची माहिती मिळताच पोलिस प्रशासन हे अजून सतर्क झाले. आधी कोरोनाचे संकट उभे ठाकले आसताना बुधवारी महाराष्ट्रासह मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची बातमी हवामान खात्याने दिली होती.
तसं कुठलेही संकट आले तर मुंबई पोलिस हे स्वत:ला महाराष्ट्रासाठी समर्पित करुन कार्य करत असतात. बुधवारी येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पोलिस हे मुंबईत ठिकठिकाणी अनेक भागात मदत करताना दिसले. तशा पोलिसांकडे विविध तक्रारी अनेक भागातून येत होत्या. सकाळ पासूनच आरबी समुद्रच्या संपूर्ण किनारपट्टीवर पोलिसांनी गस्त घातली होती. मुंबईची अनेक किनारपट्टी लागतच्या वसाहतींवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले होते. तर खबरदारीचा भाग म्हणून वरळी सी लिंकची वाहतूक ही बंद ठेवण्यात आली होती . बुधवारी सकाळपासूनच मरिन ड्राईव्ह, नरिमन पाँईट, गिरगाव चौपटी, दादर, जूहू, वर्सोवा, गोराई, मलाड मार्वे अशा सर्वच ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. किनाऱ्याजवळील नागरिकांना पालिकेच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.व आलेल्या संकटाला परतवून लावण्यात प्रशासनाच्या यंत्रणेला यश मिळाले.
महाराष्ट्रासह मुंबईत जेंव्हाही अनेक संकटे आली मग तो ९३ चा ब्लास्ट, २००५ सालचा पाऊस, २६/११ अशा अनेक संकटांना आधी सामोरे गेलाय तो या वर्दीतला पांडूरग…..
अशा या वर्दीतल्या पांडूरंगाला न्यूज अनकट कडून सैल्यूट आणि नमस्कार
” रामकृष्ण हरी माऊली “
न्यूज अनकट प्रतिनिधी; निखिल जाधव