इंदापूर, दि.२८एप्रिल २०२०: पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेवून सुमारे आठ लाख रुपयाचे पशु खादय, शेतीची खते व शालेय पोषण आहार याचे गोडावून फोडी चोरीचे वालचंदनगर, इंदापूर ( पुणे जिल्हा ) व टेंभुर्णी (सोलापूर जिल्हा) या पोलीस स्टेशनला दाखल असलेले तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
मौजे इंदापूर अकलूज रोड ता. इंदापूर येथे दि.३० मार्च २०२० रोजी रात्री येथील बाजार समिती शेजारील खताचे गोडावूनचा कडी कोयंडा व दरवाजा तोडून एकूण १ लाख ३६ हजार ४९० रुपयांच्या खताच्या गोणी अज्ञात चोरटयांनी चोरून नेले बाबत गोडावून मालक संजय चंद्रकांत दोशी रा. इंदापूर, ता. इंदापूर जि.पुणे यांनी फिर्याद दिलेवरून इंदापूर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
इंदापूर तालुक्यात दहा दिवसातच दोन कृषी मालाचे गोडावून फोडीचे गुन्हे घडलेले होते. कोरोना प्रतिबंध ड्युटीचा ताण पोलीसांवर असूनदेखील व नाकाबंदी रात्रगस्त सक्त करूनही गुन्हे घडलेले होते. गुन्हा करताना आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवलेला नव्हता. त्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.
कृषी माल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील व बारामती अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने गुन्हयाची माहिती घेवून इंदापूर, टेंभुर्णी, माळशिरस जि.सोलापूर येथे जावून वेशांतर करून गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती काढून आरोपी निष्पन्न करून ऋषीकेश किसन चव्हाण वय २४ वर्षे रा.लवंग, पाटीलवस्ती ता.माळशिरस जि.सोलापूर. संदिप जितेंद चव्हाण वय २१ वर्षे रा.तांबवे, चव्हाण वस्ती ता. माळशिरस जि.सोलापूर. योगेश चांगदेव गुटाळ वय २४ वर्षे रा.तांबवे, २५/४ फाटा ता.माळशिरस जि.सोलापूर. उज्वल धनंजय निंबाळकर वय २० वर्षे रा.पंधारवाडी ता.इंदापूर जि.पुणे. विशाल सुरेश थोरात वय २० वर्षे रा.रेडणी ता.इंदापूर जि.पुणे.यांना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुका येथून सापळा रचून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे या गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी दि. १९ मार्च २०२० रोजी पिटकेश्वर येथील गोडावूनचे पाठीमागील शटर उचकटून रूपये १ लाख ६४ हजार रुपयांचे पशुखादयाची पोती चोरल्याचे, त्यानंतर सुमारे १० दिवसांनी इंदापूर मार्केटयार्ड येथील दरवाजाचे कडीकोयंडा तोडून रूपये १ लाख ३६ हजार ४९० रुपयांच्या खताच्या गोण्या चोरल्याचे तसेच ७ एप्रिल २०२० रोजी टेंभूर्णी एमआयडीसी येथील शालेय पोषण आहार गोडावूनचे शटर उचकटून धान्य, डाळी, तांदूळ , तेल, मसाले व आयशर टेम्पो असा रूपये ५ लाखांचा माल चोरी केल्याची कबूली दिलेली आहे.
याबाबत वालचंदनगर, इंदापूर व टेंभुर्णी (सोलापूर जिल्हा) या पोलीस स्टेशनला एकूण तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
या आव्हानात्मक गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, प्रविण मोरे, गुरु गायकवाड, ज्ञानेश्वर क्षिरसागर, काशिनाथ राजापुरे यांनी करून सदर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
या सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. आरोपींनी आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबतचा पुढील अधिक तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे करीत आहेत.
यातील आरोपी हे महाविदयालयीन युवक असून गोडावूनचे शटर व कुलूप तोडणे याची माहिती त्यांनी युट्युब माध्यमातून घेतल्याचे सांगितले. दिवसा गोडावूनची माहिती काढून पाहणी करून एकमेकांना व्हॉटसअॅप मार्फत गुगल लोकेशन शेअर करून रात्रीचे वेळी एकत्र जमून पाळत ठेवायचे व चोरी करायचे.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे