वर्षभरात ७०० कोटींची कमाई करणारा “खिलाडी” अक्षय कुमार

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये बॉलीवूडच्या अक्षय कुमारचे नाव हमखास सामील असते. मात्र आता अक्षय कुमारच्या नावावर एक इतिहास रचला जाणार आहे. यंदाच्या वर्षी अक्षय कुमारने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींची कमाई केली आहे. अशी कमाई करणारा तो बॉलीवूडचा एकमेव अभिनेता ठरला आहे.
अक्षयचा केसरी , मिशन मंगल , हाऊसफुल आणि गुड न्यूज हे चार चित्रपट वर्ष २०१९ मध्ये प्रदर्शित झाले. महत्वाचे म्हणजे या चारही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. अक्षय कुमारने २०१९ मध्ये १५३ कोटींची कमाई केलेल्या, ‘केसरी’ चित्रपटापासून सुरुवात केली होती.
त्यानंतर त्याचा दुसरा चित्रपट ‘मिशन मंगल’ होता, ज्याने २०० कोटींची कमाई केली. त्याचा हाऊसफुल ४ या तिसऱ्या चित्रपटाने २०६ कोटी रुपये कमावले आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या, ‘गुड न्यूज’ चित्रपटाने आतापर्यंत १५० कोटींची कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचतच आहे.
त्यामुळे अक्षय कुमारच्या चित्रपटांनी कमाईबाबत ७०० कोटींचा आकडा गाठला आहे.
अक्षय कुमार नंतर, हृतिक रोशनने फिल्म वॉरमधून ३१७.९१कोटी आणि सुपर ३० मधून १४६.९४ कोटी कमाई करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. टायगर श्रॉफ तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने ३८७.०२ कोटी कमावले आहेत. ही कमाई त्याच्या वॉर (३१७.९१) आणि स्टुडंट ऑफ द इयर (६९.११ कोटी) ची आहे.

एका वर्षामध्ये सर्वाधिक कमाई केलेले ५ स्टार अभिनेते

अक्षय कुमार (२०१९) – ४ चित्रपट – ७१९.४९ कोटी

रणवीर सिंह (२०१८) – २ चित्रपट – ५४२.४६ कोटी

सलमान खान (२०१५) – २ चित्रपट – ५३०.५० कोटी

प्रभास (२०१७) – १चित्रपट – ५१०.९९ कोटी

हृतिक रोशन (२०१९) – २ चित्रपट – ४६४.८५ कोटी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा