वार्ताहराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची दिली धमकी

बारामती: बारामती तालुक्यातील उंडवडी कडे पठार गावातील दैनिक लोकमतचे वार्ताहर समीर किसन बनकर (वय २५ ) यांनी गावातील सुरू असलेल्या बेसुमार होणाऱ्या वाळुतस्करी थांबवावी अशी बातमी केली होती. या बातमी मध्ये बनकर यांनी कोणाच्या नावाचा उल्लेख देखील केला न्हवता, मात्र या आलेल्या बातमीचा राग मनात धरून बुधवारी सकाळी १० वाजता समीर बनकर हे त्यांचा मित्र भूषण जराड यांच्या घरात बसले असताना बजरंग जराड व दादासो जराड यांनी बनकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावर बनकर यांनी मी काय केले आहे अशी विचारणा केल्यावर तु वाळू माफियांवर बातमी करायची तुझी हिम्मत कशी झाली म्हणत समीर बनकर यांच्यावर चप्पल उगरात अंगावर धावत येऊन जीवे मारण्याची धमकी दिली.

हा सगळा प्रकार सुरू असताना समीर बनकर यांनी आपल्या मोबाइल मध्ये या जराड भावांनी केलेली शिवीगाळ व जीवे मारण्याची दिलेली धमकी चित्रित केली आहे. समीर बनकर यांनी घडलेला प्रकार बारामती दैनिक कार्यालयामध्ये सांगितल्यावर घडलेल्या प्रकारविरुद्ध बनकर यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याबाबत सगळे पुरावे दिले आहेत. पुढील तपास हवालदार अविनाश दराडे करत आहेत.

पत्रकारांना समाजातील घडणाऱ्या वाईट घटना तसेच गुन्हे आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजापुढे आणत असतात मात्र जर अश्या प्रकारे धमकावणे जीवे मारण्याची धमकी देणे घटना घडत असतील तर शासनाने कडक कायदे करणे गरजेचे आहे.या उंडवडी मध्ये झालेल्या प्रकारचा आम्ही पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो व आरोपींवर कडक कारवाई करण्या यावी अशी मागणी केली .
महेश जगताप
अध्यक्ष -बारामती ग्रामीण पत्रकार संघ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा