गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पक्षीय राजकारणाने दुरावलेले वसंत मोरे आणि रुपाली पाटील भाऊबीजेला आले एकत्र

पक्षीय राजकारणाने दुरावलेले वसंत मोरे आणि रुपाली पाटील भाऊबीजेला आले एकत्र

पुणे, २७ ऑक्टोबर २०२२ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंतर्गत राजकारणामुळे रुपाली पाटलांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. रुपाली पाटील या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होत्या. त्यांनी मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षासाठी काम केले होतेे. रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर वसंत मोरे आणि त्या दुरावल्या. तेव्हापासून ते दोघे कधी एकत्र दिसले नव्हते, पण आज भाऊबीजेच्या मुहुर्तावर रुपालीताई आणि वसंतभाऊ एकत्र दिसले.

भाऊबीजेच्या ओवाळणी कार्यक्रमानंतर दोघांनी, गतकाळातील आठवणी आणि किस्से एकमेकांना सांगत या वर्षीची दिवाळी आणि भाऊबीज साजरी केली. वसंत मोरे आणि रूपाली ठोंबरे पाटील यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यंदाच्या दिवाळी आणि भाऊबीजेमुळे दोघांमधील दुराव्याला पूर्ण विराम मिळाला आहे.

वसंत मोरे आणि रुपाली ठोंबरे पाटील यांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी ते भाऊबीजेनिमित्त एकत्र आले होते. त्यांनी एकत्र येत भाऊबीज साजरी केली आणि इतर पक्षीय लोकांना एक सकारात्मक आदर्श दाखवून दिला.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

error: Content is protected !!
Exit mobile version