गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा रितेश देशमुखचे दिग्दर्शनात पदार्पण.आगामी ‘वेड’ सिनेमाचे फर्स्टलुक, पोस्टर केले रिलीज

रितेश देशमुखचे दिग्दर्शनात पदार्पण.आगामी ‘वेड’ सिनेमाचे फर्स्टलुक, पोस्टर केले रिलीज

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२२ : कलाक्षेत्रात सुमारे २० वर्षे अभिनयाची कारकीर्द गाजवल्यानंतर रितेश देशमुखने आता दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो भूमिकाही करणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा मुंबई फिल्म कंपनीने सोशल मीडियावर केली.

दिवाळी पाडव्याच्या मूहुर्तावर रितेशने आपल्या आगामी ‘वेड’ या सिनेमाचे पोस्टर रिलीज केले. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. त्या सोबतच, ‘दिवाळी पाडव्याच्या शुभ दिवशी माझ्या दिग्दर्शित मराठी चित्रपट #वेडचा फर्स्टलूक शेअर करताना मी अत्यंत रोमांचित आणि आनंदी आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे. आता ३० डिसेंबर ला ‘वेड’. असे कॅप्शन रितेशने यावर लिहिले आहे.

अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहे. तसेच या मराठी चित्रपटात रितेश ची बायको, जेनेलियाही प्रमुख भूमिकेत असणार आहे. या आधी जेनेलियाने हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळण अशा पाच भाषांतील चित्रपटांत काम केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

error: Content is protected !!
Exit mobile version