वाशिम जिल्ह्यात भूमिपुत्रांचे अंगाला हळद लावून आंदोलन

वाशीम ,दि.२६ मे २०२० : हळदीला दहा हजार रुपये हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसह हळद उत्पादकांच्या समस्या सरकारने सोडवाव्या यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी ( दि.२५) रोजी हळद अंगाला लावून शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

हळद हे महाराष्ट्रातील प्रमुख मसाले पीक आहे व आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटाने हळदीला चार ते पाच हजार इतका अत्यल्प भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

हळद हे वर्षभराचे पीक असून उत्पादन खर्च मोठा आहे. सध्याचे भाव पाहता उत्पादन खर्चही निघणे शक्य नाही. त्यामुळे हळदीला किमान दहा हजार रुपये हमीभाव शासनाने द्यावा या प्रमुख मागणी सह हळदीला पिक विमा संरक्षण देण्यात यावं, शासनाने हळदीची खरेदी करावी, नॆसर्गिक आपत्तीत हळद पिकाला मदत देण्यात यावी, शासनाच्या विविध योजने अंतर्गत यांत्रिकीकरण व सिंचनासाठी लागणारे साहित्य हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्यात यावे, पीक कर्ज वाटपात एकरी पन्नास हजार रुपये पीक कर्ज हळद उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावे.

यासाठी शेतकरी अंगाला हळद लावून, मागणीचे फलक हातात धरून फोटो काढत राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले व सदर फोटो जिल्हा प्रशासना सह राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, कृषी सचिव यांना मेलद्वारे पाठविण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्रतील अकोला,यवतमाळ,बुलढाणा,
जळगाव,हिंगोली, नांदेड, सह राज्यातील सर्वच जिल्ह्यातून हळद उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

आंध्रप्रदेशातील गुंटुर तथा तेलंगाना, कर्नाटक राज्यातूनही शेतकऱ्यांनी भुमिपूत्रच्या हळद अंदोलनात सहभाग नोंदवला.

वाशिम येथील भुमिपूत्रच्या जिल्हा कार्यालयातून जितेंद्र गवळी, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, देव इंगोले प्रवक्ता, कार्याध्यक्ष उत्तमराव आरु, वाशिम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, रिसोड तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरे, बाजार समिती संचालक घनश्याम मापारी, अंबादास पाटील खरात, डाॅ.माधवराव हिवाळे,भागवतराव गोटे, बाजीराव पाटील हरकळ, डॉ अमर दहीहंडे, रवी जाधव, अमोल बाजाड, शिवाजी कढणे, यांच्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा