बीपीसीएल’ला खरेदी करण्याच्या तयारीत वेदांता, जमवले ५९ हजार कोटी

9

नवी दिल्ली, १७ डिसेंबर २०२०: देशातील दुसर्‍या क्रमांकाची पेट्रोलियम कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) मध्ये सरकारच्या ५२.९८ टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी सरकारला तीन खरेदीदार कंपन्या मिळाल्या आहेत. वेदांत कंपनी या शर्यतीत सर्वात पुढं दिसत आहे.

वास्तविक बीपीसीएलमधील भागभांडवल विकून सरकारला ४५ हजार कोटी रुपये मिळू शकतात. सरकार आपली ५२.९८ टक्के हिस्सेदारी विकत आहे. यासाठी तीन कंपन्यांनी सरकारकडं रस दाखविला आहे. यात वेदांत कंपनीनं ५९ हजार कोटी रुपयांची बोली लावली आहे.

खाण कंपनी वेदांत समूहाने बीपीसीएलमधील शासकीय ५२.९८% भागभांडवल मिळविण्यासाठी ईओआय दिले आहे. इतकेच नव्हे, तर बीपीसीएलच्या अधिग्रहणासाठी वेदांतनं ८ बिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ५९,००० कोटी रुपये जमा करण्याची योजना आखली आहे.

वेदांत हे पैसे शेअर बाजार आणि डेट मधून उभे करेल तसेच कर्जही घेईल. वेदान्त कर्ज घेण्यासाठी अनेक बँकांशी चर्चा करीत आहे. मिंटच्या एका अहवालानुसार, वेदांत यासाठी अनेक बँकांशी वाटाघाटी करीत आहे आणि भागीदारी करीत आहे. कंपनी यासाठी अँकर बँक नियुक्त करेल आणि या कामासाठी जेपी मॉर्गनशी चर्चा देखील प्रगत टप्प्यात आहे.

वेदांत आधीच केर्न इंडियामार्फत तेल आणि वायू व्यवसायात आहे. तथापि, वेदान्त इतका मोठा निधी उभा करू शकणार की नाही, याबद्दल तज्ज्ञांना शंका वाटत आहे. गेल्या महिन्यातच वेदांत यांनी बीपीसीएल खरेदी करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टसाठी बोली लावली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे