वीस कोटी भारतीय मनोविकाराच्या विळख्यात

32

मुंबई : आजच्या धावत्या युगात आपल्याला स्वतःकडे बघण्याशी वेळ मिळत नाही. प्रत्येक काम हे घड्याळाच्या काट्यावर असल्यासारखे करावे लागते. ओरन्तु या सर्व गोष्टींचा आपल्या आरोग्यवर किती परिणाम होतो आहे.त्यामुळे नवनवीन आजारांनीदेखील डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. यापैकी वाढता ताणतणाव मानवी आरोग्यास अधिक धोकादायक ठरत आहे. तब्बल २० कोटी भारतीय मनोविकारांच्या विळख्यात असल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे.
२०१७ मध्ये प्रत्येक सात भारतीयांमागील एक भारतीय विविध मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती मनोविराकाविषयी करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आली आहे.
‘इंडिया स्टेट लेव्हल डिसिज बर्डन इनिशिएटिव्ह’ या संस्थेने या संबंधी एक पाहणी केली होती. त्यांच्या अहवालानुसार, स्किझोफ्रेनिया, बायपोलार डिसऑर्डर, बैद्धिक विकृती, नैराश्य, चिंता आचरणासंबंधी विकार आणि ऑटिझम आदी मनोविकारांनी अनेकांना ग्रासले आहे.

गोवा, केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीतील ३.५ दशलक्ष लोकांमध्ये स्किझोफ्रेनियाचे प्रमाण २०१७ मध्ये अधिक असल्याचे दिसून आले होते. तर ७.६ दशलक्ष भारतीयांमध्ये बायपोलार डिसऑर्डर असल्याची लक्षणे दिसून आली होती. यामध्ये गोवा, केरळ, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेशमधील लोकांचा सर्वाधिक समावेश होता, असे यात नमूद करण्यात आले आहे. १९९० मध्ये मनोविकारांनी ग्रासलेल्यांचे प्रमाण २.५ टक्के इतके होते, तर २०१७ मध्ये त्यात वाढ होऊन ते ४.७ टक्के झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२०१७ मध्ये भारतात नैराश्यग्रस्त लोकांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३३.८ टक्के इतके होते, तर चिंताग्रस्त लोकांचे प्रमाण १९ टक्के, बौद्धिक विकृतीने ग्रस्त असलेल्यांचे प्रमाण १०.८ टक्के, तसेच स्किझोफ्रेनियाने ९.८ टक्के लोक ग्रस्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचा धोका भविष्यात लहान मुलांनादेखील संभावण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

एकूणच झपाट्याने होणारे आधुनिकीकरण, वाढते ताणतणाव सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, त्याचा तरुण तसेच बालमनावर होणारा परिणाम आदी गोष्टींमुळे नवनवीन मानसिक आजारांचा धोका बळावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी वेळीच योग्य दिशा देण्याची आणि जीवनशैली व मानसिक सकारात्मकतेची आवश्यकता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा