वेगमर्यादेचे नियम मोडल्यास वाहनांवर होणार कारवाई, पुणेकरांनो सावधान

उरुळी कांचन, दि. २२ जून २०२० : आपल्या देशामध्ये दरवर्षी रस्ते अपघातात सुमारे एक लाख तीस हजार लोक मृत्युमुखी पडतात तर सुमारे दोन लाख लोक कायमचे जायबंदी होतात. यातील बहुतांशी लोक १५ ते ४५ वर्ष या वयोगटातील तरुण असतात. रस्त्यावरील प्राणघातक अपघाताचे सर्वात महत्त्वाचे कारण अतिवेगाने वाहन चालवणे आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. असे स्पष्ट निर्देश महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभाग पुण्याचे पोलीस उपअधीक्षक यांनी बोलताना सांगितले.

पोलीस अधीक्षक म्हणाले आपल्या देशातील रस्ते अपघात होणाऱ्या मृत्यूंची संख्या त्याचबरोबर कायमस्वरूपी जायबंदी होणाऱ्या लोकांची संख्या ही एक गंभीर समस्या असून दुर्दैव बहुतांशी लोक हे १५ ते ४५ वर्षे वयोगटातील आणि कुटुंबातील कमावत्या तरुण व्यक्ती असतात केवळ वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आणि आपली वाहने चालवताना वेगाच्या मर्यादेचे भान न ठेवणे यामुळे या सर्व व्यक्ती रस्ते अपघातातील मृत्यूला व जायबंदी होण्यास कारणीभूत ठरतात. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग आणि आणि रस्त्यासाठी वेगवेगळी वेगमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. तशा आशयाची आधी सूचना वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक २५ ऑक्टोंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केले आहे.

तसेच रस्त्यावरील दोन निश्चित ठिकाणातील आंतर वाहनाने किती वेळेत पार केले या माहितीच्या आधारे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार आता विविध रस्त्यावरील टोल नाके येथील सीसीटीव्ही व अन्य प्रकारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मोटारसायकल प्रवासी कार व अवजड वाहने यांनी वेगमर्यादेचे उल्लंघन न करता मर्यादित वेगाने वाहन न चालवणे आवश्यक आहे.

सर्वोच्या न्यायालयाच्या निर्देशांचे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांनी प्रसिद्ध केलेल्या आधी सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सर्व वाहनधारकांना सुचित करण्यात येते की राष्ट्रीय राज्य महामार्गावर किंवा अन्य रस्त्यावर आपले वाहन घेऊन येताना वाहतुकीच्या नियमांच्या बरोबरच वेग मर्यादेचे पालन करून नियमाचे उल्लंघन केल्यामुळे आपल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार नाही याची गांभीर्याने दखल घेण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा