कल्याण, १४ ऑगस्ट २०२०: कल्याण डोंबिवलीत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे, त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून कडक नियम पाळले जात आहेत. यंदा सर्वच सणांवर कोरोनाने विरझन टाकलंय. मात्र, हे सण साजरे न करता कल्याण डोंबिवलीत नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. कोरोनामुळे या वर्षी दहीहंडी साजरी न केल्याने उत्सवात खर्च केल्या जणाऱ्या रकमेतून रुग्णालयांना व्हेंटिलेटरची मदत केली. माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाला एक उत्तम उहादरण दिले आहे.
विजय दादा पाटील मित्र मंडळ व कुणाल पाटील फाऊंडेशन आयोजित दही हंडी उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाचे त्यांचे यंदाचे हे ११ वे वर्ष होते. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहता हा उत्सव रद्द करण्यात आला. त्या खर्चातून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना कुणाल पाटील यांच्या वतीने मदत करण्यात आली. काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता रुग्णांना मदत होईल या अनुषंगाने आज साईलीला हॉस्पिटल तसेच ऑगझिल्यम हॉस्पिटल कल्याण येथे व्हेंटिलेटरसची मदत करण्यात आली.
कुणाल पाटील फाउंडेशनच्या वतीने २०१८ साली देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यात आली होती. तर २०१९ साली सांगली कोल्हापूर येथे जो महापूर आला होता तेथे देखील दही हंडी रद्द करून पूरग्रस्तांना मदत करण्यात आली होती. यंदा देखील कोरोनामुळे हा दहीहंडी उत्सव रद्द करत गरजू नागरिकांना मदत आणि रुग्णालयांना व्हेंटिलेटरची मदत केली आहे . तर कुणाल पाटील यांच्याप्रमाणेच इतर लोकप्रतिनिधींनी देखील सामाजिक मदत केली पाहिजे अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे