‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज्’ कडून राज्य सरकार तसेच पुणे जिल्ह्याला व्हेंटिलेटरची मदत

पुणे, १४ एप्रिल २०२१: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. यात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. केवळ कोरोना रुग्णांची संख्याच नाही तर राज्यातील रुग्णालयांची स्थितीदेखील भयंकर आहे. रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होत असतानाच रुग्णालयांमध्ये बेडची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे यात राज्यातील अनेक जिल्ह्यात व्हेंटिलेटर ची देखील कमतरता भासत आहे. त्यातल्या त्यात पुण्यात सध्या एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचं दिसत आहे.
व्हेंटिलेटर अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज् ने राज्य सरकारला व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पुणे जिल्ह्याला ७ व्हेंटिलेटर तर राज्य सरकारला २५ व्हेंटिलेटर  देणार आहे. आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज् ची ही मदत अनेक रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तसेच कोरोना महामारी सोबतच्या लढ्यामध्ये शासनामार्फत जे कार्य सुरु आहे त्यात एक खारीचा वाटा नक्कीच ठरेल.
कंपनीने याबाबत मुख्यमंत्री कार्यालय, आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे तसंच पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांना सर्व तपशील पाठवले असून त्या अनुसार योग्य ती कारवाही सदर कार्यालयाच्या सूचनानुसार ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्’ करत आहे .
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा