गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळवल्या बद्दल वेताळ शेळकेचा सन्मान

सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळवल्या बद्दल वेताळ शेळकेचा सन्मान

माढा २८ जानेवारी २०२१ : सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेत वेताळ औदुंबर शेळके राहणार बेंबळे तालुका माढा यांनी रौप्य पदक संपादन केले आहे.
भारत सरकार कुस्ती बोर्ड मार्फत राबविण्यात आलेल्या स्पर्धेत वेताळ शेळके यांनी विजय मिळवला आहे २४ जानेवारीला दिल्ली येथे या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या वेताळ शेळके हा अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे वस्ताद काकासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली काकासाहेब पवार यांच्या तालमीत सराव करत आहे.वेताळ शेळकेने खेलो इंडिया पदक, सबज्युनियर नॅशनल, महाराष्ट्र केसरी गोल्डन पदके मिळवली असून वेताळ शेळके हा विमलेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे.
 वेताळ शेळकेच्या कामगिरीने गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. शेळकेने बेंबळे गावचे नाव दिल्ली पर्यंत रोशन केले असल्याचे संस्थेचे संस्थापक गोविंद भोसले म्हणाले. शेळकेचा सत्कार विद्यालयाच्या वतीने उद्देश विद्यालयाचे संस्थापक सचिव गोविंद भोसले प्राचार्य के आर हुलगे, नुतन ग्रामपंचायत सदस्य संजय शंकर पवार, नागनाथ मस्के पोपट काळे,औदुंबर शेळके,पोलीस पाटील बिभीषण किर्ते, सहशिक्षक अशोक बागवाले,राजाराम टोणपे, कुबेर गायकवाड,मारुती गायकवाड,दत्‍तात्रय ननवरे,शिवाजी माने, बबन भोसले,बंडू अवताडे, प्रदीप पाटील, लक्ष्‍मण भोसले,विज्ञान गायकवाड,श्रीकृष्ण महामुनी,अचित मोरे,सौ पूनम जाधव,महादेव अनपट, तुकाराम कांबळे,भिमराव मारकड,राजू काळे व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील
error: Content is protected !!
Exit mobile version