गोल पोस्ट महाराष्ट्र ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचे राहुल गांधींना आव्हान

ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचे राहुल गांधींना आव्हान

मुंबई, १९ नोव्हेंबर २०२२ : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे. यादरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली. राहुल गांधींच्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून आले. विविध स्तरांवरून त्यांना प्रतिक्रिया आल्या, त्यातूनच मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर भाष्य करीत त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

https://ik.imagekit.io/nviqio0mcu5/WhatsApp_Video_2022-11-19_at_3.47.51_PM_21YhUeSHv.mp4?ik-sdk-version=javascript-1.4.3&updatedAt=1668853153119

शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे, की “७ बाय ११ च्या खोलीत सावरकर राहायचे. कैद्याचे कपडे घालून गळ्यात साखळदंड अडकवून अकरा वर्षे सावरकरांनी काढली आहेत. कसलाही विचार न करता असे वायफळ बरळण्यापेक्षा
राहुल गांधी यांनी ११ वर्षे सोडा, ११ दिवसही सोडा फक्त एक दिवस या खोलीत राहून दाखवावे. तुमच्या गळ्यात, हातात मी साखळदंड अडकवतो. अर्ध कच्चे मांस, महारोगी यांच्या हातचं अन्न, घाणेरडे अन्नपदार्थ, त्यातले किडे काढून तेच अन्न सावरकरांसारखे खाऊन दाखवा. त्यानंतर १५-२० काथ्या कुटायला घेऊन जातो. हे सगळं करून दाखवा मग बडबड करावी.”

सेल्युलर जेलमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या खोलीत जाऊन शरद पोंक्षे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. “हिंमत असेल तर सेल्युलर जेलमध्ये ये, या खोलीत एक दिवस राहून दाखव आणि मग बडबड कर,” असं आव्हान शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींना दिले. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार हे वेळोवेळी त्यांचे मत ठामपणे मांडत असतात. शरद पोंक्षे हे त्याच कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांचे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

error: Content is protected !!
Exit mobile version