दिग्गज क्रिकेटपटू, माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर २०२०: भारताला क्रिकेटमधील पहिला विश्वकरंडक जिंकून देणारे भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या दरम्यान कपिल देव यांच्या छातीत दुखू लागलं होतं. यानंतर तपासणी करण्यासाठी ते मध्यरात्री १ वाजता साऊथ दिल्लीमधील ओखला भागात असलेल्या फोर्टीस रुग्णालयात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर रात्री अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. कपिलदेव यांची ही शस्त्रक्रिया डॉक्टर अतुल माथुर, हृदयरोग विभागातील संचालक यांनी केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

सध्या कपिलदेव यांना अतिदक्षता विभागात डॉक्टर अतुल माथूर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. येत्या काही दिवसात त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा