ज्येष्ठ पत्रकार-लेखक शिरीष कणेकर यांचे निधन ; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे, २५ जुलै २०२३: ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शिरीष कणेकर यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी पुणे येथे झाला. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण हे कणेकरांचे मुळ गाव आहे. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे कणेकरांचे लहानपण भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेले. मुंबई विद्यापीठातून ते बीएएलएलबी झाले. मराठी लेखक, पत्रकार व कथाकथनकार म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

ते विनोदी लेखन व क्रीडा पत्रकारिता यासाठीही ख्यातनाम होते. त्यांचे कणेकरी, माझी फिल्लमबाजी हे विनोदी कथनाचे कार्यक्रम विशेष गाजले. क्रिकेट व चित्रपटसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय होते. त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून वृत्तपत्रांतून स्तंभलेखनही केले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा