गोल पोस्ट इतर ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन

ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन

मुंबई, 16 फेब्रुवारी 2022: गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन झालं. 70 वर्षीय बप्पी लाहिरी यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी रात्री बप्पी लाहिरी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना दवाखान्यात आणण्यात आलं जेथे डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाले. बप्पी लाहिरी हे काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या वर्षभरापासून त्यांना हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या.

मनोरंजन विश्वातील लोक लता मंगेशकर यांच्या निधनानं सावरले नव्हते की तोच बप्पी लाहिरी यांच्या निधनाच्या बातमीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version