सोलापूर, ३ मे २०२३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. आर. के. कामत यांची राज्यपाल रमेश बैस यांनी निवड केली. या बाबतचे पत्र कुलपती कार्यालयाकडून देण्यात आले आहे. डॉ. कामत मुळचे कोल्हापूरचे असून मागील ९ महिन्यांपासून ते डॉ. होमी भाभा राज्य विधापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी शिवाजी विद्यापीठमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे.
डॉ. कामत यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांनी नामांकित जर्नल्समध्ये २०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १६ पुस्तके लिहिली आहे. २० विधार्थ्यांना पीएचडी साठी मार्गदर्शन केले आहे. मागील पाच वर्षात त्यांना १० कोटी रुपयांचे संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, ज्यात युरोपियन युनियनने मंजूर केलेल्या प्रकल्पाचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या उच्च शिक्षणमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी रुसा या योजनेच्या अंतर्गत डॉ. होमी भाभा विधापीठांचे महाराष्ट्रातील पहिले समूह विधापीठ म्हणून २०१९ मध्ये स्थापना केली होती. व त्यांचे पहिले नियमित कुलगुरू म्हणून डॉ. कामत यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये कार्यभार स्वीकारला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर