स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ च्या कुलगुरूंची अभाविप ने घेतली भेट

नांदेड, २२ ऑक्टोबर २०२० :अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड शाखेच्या शिष्टमंडळाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ चे कुलगुरू मा.उद्धव भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये अनेक विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या अनेक शैक्षणिक समस्यांवर कुलगुरूंशी चर्चा केली गेली. सध्याच्या परिस्थितीत अभ्यासिका या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गोष्टी कडे लक्ष केंद्रित करून विद्यापीठ परिसरात लवकर अभ्यासिका सुरु कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री स्वप्निल बेगडे यांनि या भेटीमध्ये कुलगुरूंसमोर मांडली. त्याचबरोबर येणाऱ्या काळात कशाप्रकारची शैक्षणिक व्यवस्था करण्यात येईल याबाबत कुलगुरू सरांनी मार्गदर्शन केले. तसेच, सध्या सुरु असलेल्या परीक्षामधे कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, नांदेड महानगर मंत्री बसवराज मेंगा पुरे, व्यंकटेश नारलावर आणि
आदी अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड