माढा, २४ डिसेंबर २०२०: माढा तालुक्यातील बेंबळे येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून दि.२३ रोजी जागतिक शेतकरी दिनानिमित्ताने बँकेतील शेतकरी ग्राहकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शेतकरी नागनाथ महादेव मस्के म्हणाले शेतकरी म्हणजे भारत देशाचा कणा आहे. ग्रामीण भागातील बँका या शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारावर आज नावारूपाला आलेल्या आहेत. बागायती भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची बिले बँकेत जमा होतात व शेतकरी ती बीले वर्षभर पैसे बँकेत ठेवून लागेल त्या प्रमाणात बँकेतून पैसे काढतो व खर्च करतो. त्यामुळे बँकेच्या उत्पन्नात वाढ होते. तर शेतकऱ्यांचे पैसे सुरक्षित राहतात. असे बँकेतील शेतकरी ग्राहक नागनाथ मस्के यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बँक मॅनेजर पी एम देशपांडे, असिस्टंट मँनेजर आनंद पटवर्धन, क्लार्क मनीष मानकर, नागनाथ महादेव मस्के, बाळासाहेब पांडुरंग पवार, संतोष विश्वनाथ पवार, नागनाथ शेंडगे, नागनाथ ताकतोडे व शेतकरी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील