प्रयागराज महाकुंभात तरुणीचा टॉवेलमधील स्नान व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर संतापाची लाट

7

प्रयागराज १ फेब्रुवारी २०२५ ; प्रयागराज महाकुंभात देश-विदेशातील लाखो भाविक स्नानासाठी गर्दी करत आहेत. मात्र, याच धार्मिक वातावरणात एक तरुणी टॉवेलवर गंगेत स्नान करण्यासाठी उतरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे नेटिझन्स संताप व्यक्त करत असून, धार्मिक कार्यक्रमाचा अवमान झाल्याची भावना अनेकांनी मांडली आहे.

https://www.instagram.com/reel/DFRR8aLTnfN/?utm_source=ig_web_button_share_sheet

व्हायरल व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचा टॉवेल गुंडाळून एक मुलगी घाटावरून गंगेत स्नान करण्यासाठी जाताना दिसत आहे. तिचे हे वर्तन पाहून उपस्थित भाविक आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे, या तरुणीने स्वतःच हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. @samuelina45 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत 70 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

या प्रकरणावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने लिहिले, “हा गोवा किंवा मालदीवचा समुद्रकिनारा नाही, हा प्रयागराज महाकुंभ आहे. येथे अशा भोंगळपणाला थारा नाही.” तर काहींनी धार्मिक कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारच्या रील्स बनवण्यास विरोध दर्शवला आहे. काही लोकांनी पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या घटनेनंतर धार्मिक श्रद्धेचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधीं – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा