विधानसभा उपसभापती आनंद मामनी यांचे निधन

बेंगळुरू, २३ ऑक्टोबर २०२२: कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आणि तीन वेळा भाजपचे आमदार राहिलेले आनंद मामनी यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. गेल्या महिनाभरापासून त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मामनी यांना मधुमेह आणि यकृताचा संसर्ग झाला होता. बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरुवातीला वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना चेन्नई आणि नंतर मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते.

मामनी हे सौंदत्ती मतदारसंघाचे आमदार होते. त्यांचे पार्थिव आज (रविवार) त्यांच्या गावी आणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मामनी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आनंद मामानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, आमच्या पक्षाचे आमदार आणि राज्य विधानसभेचे माननीय उपसभापती आनंद चंद्रशेखर मामानी यांच्या निधनाच्या वृत्ताने आम्हाला अतिशय दु:ख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो…ओम शांती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा