गहिनीनाथ गड: कट्टर राजकीय विरोधक असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गहिनीनाथ गडावरच्या एका कार्यक्रमात एकत्र दिसले. संत वामनभाऊ महाराज यांचा ४२ वा पुण्यतिथी महोत्सव पार पाडत आहे. त्यानिमीत्ताने हे भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर दिसले. मात्र त्यांनी एकमेकांना कसलाही प्रतिसाद दिला नाही. दोघे एकत्र आल्याने काय बोलतात याची उत्सुकता सर्वांना होती.
पंकजा मुंडे दरवर्षी गहिनीनाथ गडावरच्या व्यासपीठावर असतात. तर, धनंजय मुंडे हे पहाटेची पूजा करुन जातात. मात्र, यावेळी नव्यानेच पालकमंत्री बनलेल्या धनंजय मुंडे यांचीही जाहीर कार्यक्रमात हजेरी पाहायला मिळली. विधानसभा निवडणुकीत यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा दारुण परावभ केला होता. भाऊ-बहीण असलेले पंकजा आणि धनंजय हे राजकारणात परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच दोघांमधील संघर्षाची ठिणगी पडली होती. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पुतण्या धनंजय मुंडे यांना त्यांचा राजकीय वारसदार मानले जात होते. मात्र, २००९ साली गोपीनाथ मुंडे परळी मतदारसंघातून मुलगी पंकजा मुंडेंना उमेदवारी देली. परिणामी धनंजय मुंडे नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली; पण गृहकलह वाढला अखेर जानेवारी २०१२ मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला. तर, २०१३ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय विजयी झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला.
विधानसभा निवडणुकीत संघर्ष – विधानसभा निवडणूक प्रचारदरम्यान केज तालुक्यातील वीडा येथे प्रचारसभेदरम्यान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून दोघांतील संघर्ष वैयक्तिक पातळीवर आला.यामुळे परळीतील वातावरण चांगलेच तापलं होतं. भावणीक पातळीवरील आरोपानंतर या निवडणुकीत धनंजय यांनी पंकजा यांचा तब्बल बत्तीस हजार मतांच्या फरकाने दारुण पराभव केला. राज्यातही संत्तातर झाले आणि दोघांच्या भुमिकांचीही अदलाबदल झाली.