बारामती: आज दिनांक २५ शुक्रवार शहरातील क्रिएटिव्ह अकॅडमी मधील ८ वी ९ वी तील अकॅडमीने भरवलेल्या आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या कार्यक्रमाचे उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी उदघाटन केले.यावेळी भरावलेल्या सायन्स एक्झिबिशन मध्ये उत्कर्ष दानाने व ऋषभ देसाऊ या विद्यार्थ्याने महिलांसाठी बनवलेल्या सेफ्टी शुजची पाहणी करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या शुजचे वैशिष्ट्य म्हणजे या शूज मध्ये महिलांचे लोकेशन समजणार आहे. तसेच या शूज मध्ये व्हॉईस रेकॉर्डिंग, इलेक्ट्रिक करंट आदी महिलांच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. अनेक वेळा महिला कामासाठी, प्रवासात किंवा उशिरा जाताना छेडछाड तसेच गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागते त्यावेळी क्रिएटिव्ह अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या शुजचा महिलांना चांगला उपयोग होऊ शकतो.
प्रदर्शन पाहायला आलेल्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी या सेफ्टी शुजचे कौतुक केले. तसेच निर्भया पथकाच्या प्रमुख अमृता भोईटे यांनी देखील या शूजला पसंती देत हा शूज भविष्यात महिला व मुलींकरिता महत्वाची संरक्षण बाब ठरेल असे भोईटे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी आयुष्यात कितीही यशस्वी झालात तरी जमिनीवर पाय ठेवा चांगला अभ्यास करून यशस्वी व्हा अशा शिरगावकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.