विद्यापीठ चौकात वाहतूककोंडीला ‘ब्रेक’! नवीन रॅम्पला स्थायी समितीची मंजुरी

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडी आता कमी होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरून औंध-बाणेर-पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेनचा ‘कनेक्टिंग आर्म’ (रॅम्प) उभारण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनचालकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

या नवीन प्रस्तावानुसार, सेनापती बापट रस्त्यावरील वाहनांना थेट विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला जोडले जाणार आहे. हा रॅम्प १५२ मीटर लांबीचा असेल. तसेच, शिवाजीनगरकडून औंधकडे जाण्यासाठी २१० मीटर लांबीचा ग्रेड-सेपरेटरही प्रस्तावित आहे. या कामांमुळे वाहनचालकांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीचा ताण कमी होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – चंद्रशेखर रहांगडाले