गोल पोस्ट इतर लग्नाच्या चार महिन्यांतच विघ्नेश अन् नयनतारा झाले आई-बाबा

लग्नाच्या चार महिन्यांतच विघ्नेश अन् नयनतारा झाले आई-बाबा

पुणे, ११ ऑक्टोंबर २०२२: साउथ ची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा लग्नाच्या चार महिन्यानंतर आई झाली आहे. नयनताराने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे, याबद्दल सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत विघ्नेशने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

विघ्नेशने नुकतीच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, यात त्यांनी त्या बाळाच्या पायाचे चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नयनतारा आणि विघ्नेश मुलांच्या पायाला किस करताना दिसत आहेत. फोटोसोबत विघ्नेशने लिहिले की नयन आणि मी आज अम्मा आणि आप्पा बनलो आहोत. आम्हाला जुळे मुले झाली आहेत. आमच्या प्रार्थना आणि पूर्वजांचे आशीर्वाद आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रूपाने मिळालेले आहेत आम्हाला तुमच्या प्रार्थनाची गरज आहे.

नयनतारा आणि विघ्नेश यांनी बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर यावर्षी ९ जून रोजी तामिळनाडूतील महाबलीपुरम येथील एका रिसॉर्टमध्ये लग्न केले होते. नानू रावडी धन या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांची प्रेमकहानी सुरू झाली होती. या लग्न सोहळ्याला दक्षिणात्य तसेच बॉलीवूड चित्रसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. शाहरुख खान, रजनीकांत ,सूर्या, ए आर रहमान, मनिरत्न, विजय सेतुपती, इत्यादी लग्नाला उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version