गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा विहरीत बुडून चिमुकल्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

विहरीत बुडून चिमुकल्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

इंदापूर, दि.३१ मे २०२०: इंदापूर तालुक्यातील शेळगाव परिसरात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी मुलांचे वडिल संजय गंगाराम वाघमोडे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास मालन संजय वाघमोडे या घराजवळील विहिरीमध्ये पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या.
त्यांच्या पाठीमागे मुलगा सार्थक (वय ३ ) व अनुष्का (वय दीड वर्षे) हे दोघे बहिण – भाऊ विहिरीमध्ये उतरले. दोघांचा पाय घसरल्याने पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबतचा अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश माने करीत आहेत. सख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version