गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा विजय देवरकोंडाचा लायगर फ्लॉप? किती आहे लायगर’ची पहिल्या दिवसाची कमाई!

विजय देवरकोंडाचा लायगर फ्लॉप? किती आहे लायगर’ची पहिल्या दिवसाची कमाई!

मुंबई, २७ ऑगस्ट २०२२: साऊथ स्टार विजय देवरकोंडाचा लायगर हा सिनेमा काल रिलीज झाला आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हे अलीकडे रिलीज झालेले दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडा लायगर काय कमाल करतो, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे.

तर सिनेमाच्या फर्स्ट डेचे बॉक्स ऑफिस नंबर्स समोर आले आहेत.पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेला लायगर हा एक स्पोर्ट ड्रामा आहे. या चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हिंदीसोबत तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा भाषांत हा सिनेमा रिलीज झालाय.

चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित ‘लायगर’मध्ये प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन, रम्या कृष्णन आणि रोनीत रॉय यांच्याही भूमिका आहेत.

नुकतंच समोर आलेल्या ट्रेड रिपोर्ट्सनुसार, लायगरने हिंदी मध्ये पहिल्या दिवसात सुमारे ५.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. लायगर चित्रपटाचा ट्रेलर आणि त्याचं जोरदार प्रमोषण पाहून हा सिनेमा चागलं कलेक्शन करु शकेल अशा अनेक अपेक्षा होत्या. पण सिनेमा अपेक्षा पुर्ण करत नाही. केवल कथाच नाही, तर चित्रपट तांत्रिदृष्ट्या फार कमकुवत आहे.

डिअर कॉम्रेड, अर्जुन रेड्डी, गीता गोविंद’ या साऊथ चित्रपटांतून अफाट लोकप्रियता मिळवलेला अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडा होय. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा लागून होती.
पहिल्या दिवशी चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट किती पसंद पडतो, तसेच, किती बॉक्स ऑफिस कलेक्शन करतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version