गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई विजय खातू यांच्या कार्यशाळेला भीषण आग

विजय खातू यांच्या कार्यशाळेला भीषण आग

मुंबई, दि. २ मे २०२०: गणेश मूर्तींसाठी जगभरात ख्याती असलेले मुंबईतील प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांची चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळ गणेश मूर्ती कार्यशाळा आहे. आज इथे मोठी आग लागली. सध्या लाँकडाऊन सुरू असल्यामुळे कार्यशाळेत कोणीही नव्हते. मात्र लागलेल्या आगीने कार्यशाळेचं मोठं नुकसान केलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन बंबासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version