मुंबई, २९ ऑगस्ट २०२२: बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच त्याच्या जवान या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
जवान या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर अभिनेत्री नयनतारा यामध्ये शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी विजयनं किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या चित्रपटात काम करण्यासाठी विजयनं २१कोटींचे मानधन घेतलं आहे. विजय हा एका चित्रपटासाठी १५ ते १७कोटी मानधन घेतो. विजय ने या आधी ९६, पेटा, सेतूपती, विक्रम वेधा, मास्टर आणि यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जवान या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. २ जून २०२३ रोजी तुमचे मनोरंजन करण्यासाठी ‘जवान’ चित्रपट रिलीज होतो आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव