गोल पोस्ट आरोग्य विकास दूबेला उज्जैन मधून कानपूरला नेणाऱ्या पोलिसांपैकी एक कोरोना पॉझिटिव्ह

विकास दूबेला उज्जैन मधून कानपूरला नेणाऱ्या पोलिसांपैकी एक कोरोना पॉझिटिव्ह

कानपूर, दि. १२ जुलै २०२०: विकास दुबे याला उज्जैनहून कानपूरला आणणाऱ्या टीममधील एका शिपायाचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. शुक्रवारी सकाळी भौंती महामार्गावर ज्या गाडीचा अपघात झाला होता त्या गाडीत हा देखील होता. विकास दुबे सह आणखीन चार पोलिस कर्मचारी या वाहनांमध्ये होते.

विकास दुबे ला नेत असताना झालेल्या अपघातात हा पोलिस कर्मचारी जखमी झाला होता. या पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यासोबत असलेल्या इतर चार पोलीस कर्मचाऱ्यांना देखील संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. तसेच यानंतर तो ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला होता त्यांना देखील आता संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

कानपूर हत्याकांडातील गुन्हेगार विकास दुबे पोलिसांना चकमा देत मध्य प्रदेशमधील उज्जैन मध्ये पळून आला होता. उज्जैन मध्ये त्याने महाकाल मंदिरामध्ये स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर त्याला नेत असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला व त्यानंतर चकमकीत विकास दुबे मारला गेला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version