विकास दुबे: एनकाउंटर की हत्या ?

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने भूमिका साकारलेले दोन चित्रपट ”पोलीसगिरी” आणि ”वास्तव” आज प्रामुख्याने आठवतात. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये सर्वत्र “विकास” दिसत होता. मोदींचा विकास नाही, तर कुख्यात गुंड आणि आठ पोलिसांच्या हत्येचा मुख्य आरोपी ”कानपूर वाला विकास दुबे”. आज या गॅंगस्टरचा “एनकाउंटर” झाला (कि करण्यात आला?) देवच जाणे. पण आजच्या या ब्रेकिंग न्यूजने सर्वत्र खळबळ माजली. तसं विकास दुबे मारला जाणार ही गोष्ट कुणासाठीही नवीन नव्हती. मात्र उत्तर प्रदेशचे पोलीस इतके नादान असतील असं वाटलं नव्हतं. मात्र आज ही एनकाउंटरची बातमी आली आणि सर्वत्र त्याच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

सुरवातीचा घटनाक्रम:
२ जुलैच्या रात्री कानपुर पोलीसांची टीम विकास दुबेला अटक करण्यासाठी बिकरु गावात पोहोचली. मात्र पोलीसांपेक्षा जास्त चांगली तयारी ही विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांची होती. विकास दुबेला अगोदरच याची कल्पना होती असं बोललं जातंय. जेव्हा पोलीस त्याच्या घराजवळ पोहोचले तेव्हा अचानक चारही बाजूंनी पोलीसांवरच हल्ला झाला. प्रचंड गोळीबार सुरु झाला आणि त्यात आठ पोलीस मारले गेले. तेव्हापासूनच विकास दुबे फरार होता. देशभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग त्याला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस पोलीसांवर दबाव येऊन ते कामाला लागले. स्पेशल टास्क फोर्स(STF) नेमली गेली. दोन – तीन दिवसांनंतर तो फरीदाबाद येथील एका हॉटेलमध्ये लपला असल्याचे कळले मात्र पोलीस येण्याआधीच तो तिकडून फरार झाला.

अटकेचा दिवस:
मग उजाडतो ९ जुलै चा दिवस. उत्तरप्रदेशमधून फरार असलेला विकास दुबे अचानक मध्य प्रदेशातल्या उज्जैन येथील महाकाल मंदिरात पकडला जातो. आणि इथूनच सुरु होतो त्याच्या खात्माचा प्रवास. मुळात विकास दुबे हा पकडला गेला कि त्याने आत्मसमर्पण केले यावरून सुद्धा अनेक वाद आहेत. कारण २ जुलैच्या हत्याकांडानंतर विकास दुबे मोस्ट वॉन्टेड आरोपी झाला. उत्तर प्रदेश पोलीसांकडून त्याचा सर्वञ शोध सुरु होता. असं असताना देखील शेकडो किलोमीटर रस्तेमार्गाने प्रवास करून, पोलीसांना चकवा देत तो मध्य प्रदेशात पोहोचतो. तिथे महाकाल मंदिरात कामावर असलेला एक सामान्य आणि निशस्त्र सुरक्षा अधिकारी त्याला पकडतो, आणि मग उज्जैन पोलीस त्याला अटक करून युपी STF कडे सुपूर्द करतात. हे सर्वकाही खूपच संशयास्पद आहे. आणि जे हे खरं असेल तर पोलीसांच्या आणि सरकारच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे. पोलीसांच्या सांगण्यानुसार त्याला पकडलं गेलं, मात्र त्याला पकडल्या जाण्याअगोदरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्यात तो मंदिरात अगदी आरामात चालताना दिसतोय, पोलीसांसोबत चालताना पोलीसांनी त्याला बेड्या तर घातल्या नाहीच शिवाय त्याचा हाथ देखील पकडलेला नाही. मात्र जेव्हा तो मंदिराबाहेर आला तेव्हा कॅमेऱ्यासमोरच ”मे विकास दुबे हू… कानपुर वाला …’ असं मोठ्याने ओरडून तो सांगू लागला. तो एक चलाख गुन्हेगार होता. त्याला माहित होतं कि त्याच्या अनेक साथीदारांना पोलिसांनी अगोदरच यमसदनी धाडलं आहे. त्यामुळे आपलंही असंच एनकाउंटर होऊ नये म्हणून मोठ्या चलाखीने त्याने सार्वजनिकरीत्या आणि सार्वजनिक ठिकाणी कॅमेऱ्यासमोरच सरेंडर केले. जेणेकरून पोलीस त्याला अटक करून न्यायालयात उभं करतील आणि नंतर “तारीख पे तारीख” हे सत्र सुरु होऊन त्याचा जीव वाचू शकेल. असा विचार करूनच त्याने आत्मसमर्पण केलं असावं. मात्र उत्तर प्रदेश पोलीस आपल्यापेक्षाही दहा पावलं पुढे असतील हा विचार त्याने स्वप्नात देखील केला नसावा. इथूनच त्याची उलटी गिनती सुरु झाली.

१० जुलै – विकास दुबेचा अंत
उज्जैन पोलीसांनी विकास दुबेला यूपी एसटीएफच्या ताब्यात दिलं आणि आता त्याला उत्तर प्रदेशातल्या कानपुर येथे आणण्यासाठी परतीचा प्रवास सुरु झाला. डझनभर सशस्त्र पोलीस अधिकरी, अनेक गाड्यांचा ताफा आणि सर्वात शेवटी पत्रकारांची एक गाडी असा प्रवास चालू होता. सोबतच मुसळधार पाऊसही सुरु होता. अशातच अचानक पत्रकारांच्या गाडीला ताफ्यापासून दूर केले जाते. मग काही वेळातच महिंद्रा टीयूव्हीही ३०० ही गाडी ज्यात विकास दुबेला बसवलं गेलं होतं ती पलटी झालेली दिसते. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांकडून पत्रकारांना सांगितलं जातं कि गाडीचा अपघात झाल्याने जखमी विकास दुबेला आणि पोलिसांना दवाखान्यात नेण्यात आलं आहे. मात्र काही वेळातच विकास दुबे याचा एनकाउंटर झाल्याची बातमी येते. बॉलीवूड सिनेमाला साजेशी अशी स्क्रिप्ट वाचल्यासारखं तुम्हाला नक्की वाटत असेल, मात्र पोलीसांनी दिलेली माहिती अशीच आहे.

पोलीसांनी काय सांगितलं?
पोलिसांच्या माहितीुसार, उज्जैनहून कानपूरकडे येत असताना लवकर पोहोचण्याच्या उद्देशाने वाहने वेगाने चालवली जात होती. अशातच रस्त्यावरील डिव्हाईडरला धडक लागण्याने विकास दुबे ज्या गाडीत बसला होता ती गाडी पालटली. याचाच फायदा घेऊन त्याने सोबत असलेल्या पोलीसाची रिव्हॉल्वर हीसकावली आणि तो पळू लागला. त्याला सरेंडर करण्यास सांगितले मात्र त्याने उलट पोलीसांवरच गोळीबार केला. त्यात काही पोलीस जखमी झाले. मग आत्मरक्षणासाठी पोलीसांनाही त्याच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत विकास दुबेला दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असं पोलीसांचं म्हणणं आहे. वाटते ना ही एखादया बॉलीवूड सिनेमाची पटकथा?

विकास दुबेचं जिवंत राहणं गरजेचं का होतं?
विकास दुबे हा एक दहशहतवादी, हिस्ट्रीशीटर गुन्हेगार आणि आठ पोलिसांचा हत्यारा होता हे १००% खरं असून याबद्दल दुमत नाही आणि त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूतीही नाही. तो कधी ना कधी मरणारच होता. मात्र त्याच्या अशा एनकाउंटरमुळे पोलीसांवर, प्रशासनावर, उत्तरे प्रदेश सरकारवर, न्यायव्यवस्थेवर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विकास दुबे हा स्वतः राजकारणात होता. जवळपास सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी, पोलीस अधिकाऱ्यांशी आणि उद्योजकांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. म्हणूनच तो इतकी वर्षे अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही तो मुक्तपणे फिरत होता. मात्र आठ पोलीसांच्या हत्याकांडाने त्याच्या पापांचा घडा भरला आणि तो मारला गेला. पण तो जिवंत असता तर त्याच्याकडून अनेक माहिती, भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट नेते यांच्याशी असलेली अनेक गुपितं बाहेर आली असती. त्यामुळेच त्याला जाणीवपूर्वक आणि पूर्णतः प्लॅनिंगसह मारले गेले असे अनेकांचे म्हणणे आहे. आज अनेक नेते, पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि अगदी सामान्य माणूसही यावर भरभरून आपली मतं व्यक्त करीत आहे.
ट्विटरवरील काही कमेंट्स पाहुयात –

1) प्रियंका गांधी – नेत्या, काँग्रेस: उप्र की कानून-व्यवस्था बदतर हो चुकी है। राजनेता-अपराधी गठजोड़ प्रदेश पर हावी है। कानपुर कांड में इस गठजोड़ की सांठगांठ खुलकर सामने आई।कौन-कौन लोग इस तरह के अपराधी की परवरिश में शामिल हैं- ये सच सामने आना चाहिए। सुप्रीम कोर्ट के मौजूदा जज से पूरे कांड की न्यायिक जाँच होनी चाहिए

२) रणदीपसिंह सुरजेवाला – प्रवक्ते, काँग्रेस: भाजपा शासन में ‘उत्तर प्रदेश’ अब ‘अपराध प्रदेश’ बन गया है। विकास दुबे संगठित अपराध का एक मोहरा था। उस संगठित अपराध के सरगना असल में हैं कौन? विकास दुबे के एनकाउंटर के बाद अनेकों सवाल सार्वजनिक जेहन में खड़े हो गए हैं, जिनका जवाब आदित्य नाथ सरकार को देना होगा।

३) विनोद कापरी, लेखक व दिग्दर्शक: एक कारकार में पाँच लोगकार पलट गईऔरपलटी हुई कार मेंघायल और हथकड़ी में जकड़ेविकास दुबे ने STF के चार चार बहादुर जवानों की पिस्टल भी छीन लीफिर वो गाड़ी से निकला4-4 जवान देखते रहे STF के फ़िट जवानअंदर ही फँसे रह गएऔरकल तक लंगड़ा कर चल रहा #VikasDubey भागने लगा

४) अखिलेश यादव,माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, सपा नेते: दरअसल ये कार नहीं पलटी है, राज़ खुलने से सरकार पलटने से बचाई गयी है.

५)  सोहित मिश्रा – पत्रकार, NDTV: विकास दुबे ने अगर एनकाउंटर के डर से खुद को सरेंडर किया था तो फिर आखिर वो भागने की कोशिश क्यों करेगा?क्या यूपी पुलिस ने विकास दुबे को लाने की पुख्ता तैयारी नहीं की थी जो हर बार कोई भागने की कोशिश करता है और मारा जाता है?#VikashDubeyKilled

६)  रवींद्र आंबेकर – संपादक, मॅक्स  महाराष्ट्र: विकास दुबेचं एन्काऊंटर का झालं ते समजून घेण्यासाठी ‘वास्तव’ चित्रपट पाहा !!! #VikasDubey #vikasDubeyEncounter

७) राजू  परुळेकर  – मुलाखतकार: क्या देश की न्यायपालिकांओं को अब संविधान और कानूनी किताबों का एनकाऊंटर करना चाहीए?

८) कीर्तिश भट्ट – व्यंगचित्रकार: जो लोग गाड़ी पलटने और एनकाउंटर की बात पर चौंक रहे हैं पहले तो उनके ओवरएक्टिंग के पैसे काटो.

९) प्रकाश आंबेडकर, नेते : वंचित बहुजन आघाडी: विकास दुबे तो बदमाश था ही। लेकीन पुलीस उससे बदमाश निकाली। विकास दुबे के इन्काऊंटर से कई लोगो के नाम, काम सामने आने की उम्मीद थी। अब वो लिंक ही खत्म हो गयी !

१०) अनिल शिदोरे, नेते – मनसे: अनेकांचा अंदाज होता की चौकशी होण्याआधीच विकास दुबेला मारलं जाईल, कारण त्याच्याकडे अनेकांची गुपितं असतील.. इतकं अंदाज केल्याप्रमाणे होईल असं वाटलं नव्हतं. कारण राजकारणात असं होत नाही.. पण व्यवस्थेला हा धोकाही घ्यायचा होता इतकी महत्वाची माहिती दुबेकडे असावी हे महत्वाचं..

११) रश्मी पुराणिक, पत्रकार: हैद्राबाद बलात्कार प्रकरण असो किंवा विकास दुबे…न्याय करण्याचं काम न्याय संस्थांचे आहे, पोलिसांचे काम आरोपींना न्यायालयापर्यंत नेण्याचं आहे! पोलिसांनी न्याय करायला सुरुवात केली तर ही व्यवस्थेसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे…#WrongIsWrong

एकूणच सोशल मीडियावरही काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक हे या एनकाउंटरकडे  संशयाच्या नजरेनेच पाहत आहेत. आता यात आणखी काय नवी माहिती मिळते आणि काय नवी गुपितं उघडतात का? हे येणारा कालच ठरवेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे .

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा