विकीर

73

लीना को माॅं की बहू बनाओ मिशन !!! (भाग १)

आणि finally आईची ती महिला मंडळ वाली पिकनिक संपली होती. मला चक्क स्टेशनाला घ्यायला नको येउ सांगितलं होत. डोक्यात आधी काही आलं असेल तर कपाट. कपात आवरलं पाहिजे, नाहीतर इतके दिवस माझा बाळा एकटा राहिला वैगरे ऐवजी काय काय श्लोक निघाले असते अमृतवाणी बनून देवालाच माहिती. बर देव पण आईला घाबरून नक्की कपाटं आवरत असणार कारण त्याला काही म्हणजे काहीच ऑपशन नसत. ते त्रिशुळाने जादू वैगरे करत असतील तर काय माहित पण तिन्ही जगाचा स्वामी पण जर आई विना भिकारी असेल तर नक्कीच त्याची आई पण काही वेगळी नसणार. लाव कपाट !

How to fold cloth fast अस गूगलवर टाकलं आणि बराच काही आलं ना, तेव्हाच कन्फर्म झालं हा आपलाच नाही तर जगात प्रत्येकाचा लोचा आहे. शेवटी काय स्वामी तिन्ही जगाचाही कपाट लावी ! नशीब किचन काही वापरला नव्हता, चहा बनवण्याशिवाय. आईचा कॉल आला. खाली ये म्हणाली होती. मावशी पण येणार होती तिच्या सोबत. काका जर्मनीहुन आमच्याकडेच येणार होते तर मावशी काकाचा सोबत जायचा प्लॅन होता. एअरपोर्ट जवळ असल्यामुळे आमचं घर कधी कधी ओव्हर नाईट स्टेचा अड्डा होतो. बर मी बराच वेळ खाली उभा होतो. आईची काही रिक्षा येत नव्हती. पण गेट जवळ ओलाची कॅब आलेली दिसली. दोनदा होंक ऐकून मी दरवाजा उघडला. समोर कोणी तरी मुलगी दिसली म्हणून मी लक्ष दिल नाही, आणि आपली काळी पिवळी ऑटो बघायला लागलो. काही झालं तरी माझी आई इतक्या दिवसाने मला दिसणार होती.

विकीर सामान घेतोस ना, मागे वळून पाहिलं तर चक्क आई आणि मावशी. आईला!!( हे उद्गारवाचक म्हणून वापरलय आईसाठी नाही) ह्या दोघी डायरेक्ट ओला करून.
तुला ओला बुक करता येते मावशी? मावशीने जवळ घेऊन गालाचा मुका घेतला, जरा ऑकवर्ड वाटलं,पण माझं उत्तर मला मिळालं नव्हतं. घर नीट ठेवलाय ना? आईचा आवाज, म्हणजे काय रोज सकाळ संध्याकाळ त्याला जेवायला द्यायचो, रोज गरम पाण्याने आंघोळ घालायचो, रात्री झोप नाही आली कि बोलायचो ना, उगी उगी उगी तुझी मन्म्मा येणार हां, लवकरच.. -मी . गप नालायक !-आई. सामान काढून घेणार इतक्यात, काकू १० रुपये सुटते आहेत का असा आवाज आला कॅब मधून, आहे मी देतो बोलताना आश्चर्य वाटलं, कॅब ड्राइवर मुलगी आहे?
तशी नॅव्हिगेटरवर सीट वरून मुलगी उतरली, वॉव सही होती. आई मावशी समोर माझ्यातला वयात आलेला मुलगा लपवत मी गप बॅग उचलत. पूल केली होती का?
तशी आई तिला १० ची नोट देत मला म्हणाली लिनाची पण बॅग काढना मागच्या सीट वर आहे.चअअ… चटकाचा बसला, लीना काय? नाव तर तिच्या इतकाच हॉट आहे. नाही नाही राहू द्या मी घेते म्हणत लीना पुढे आली, मोठी पाठीवर अडकवायची ट्रेकिंग बॅग बाहेर काढत माझ्याकडे बघून छान हसली. हायं !!- ती. हाय -मी. आई आणि मावशीच्या गप्पा बॅकग्राऊंड स्कोर सारख्या वाटत होत्या आणि सीन माझा आणि लीना चा वाटत होता, सायलेंट सीन!

मीच आधी हाय बोलले वैगरे विचार करणारी मुलगी वाटत नव्हती ती, पण ही आहे तरी कोण आणि आईने हिला डायरेक्ट घरी का आणलं?
बर मावशीची मूलं तर अजून छोटा भीम आणि खूप खूप तर आर्यनमन पर्यंत पोहचलेली. इतक्या मोठ्या आणि छान मैत्रिणी पर्यंत पोहचायला त्यांना अवकाश होता बराच.

दार उघडून, आपलं घर ते आपलच बाबा. आता आराम वाटला. सामान तसाच टेकवून सगळे बसले, लीना पण, ती तर स्वतःचच घर असल्या सारखी बसली. बिन्दास्त मुलगी पण काय अदब होती तिच्यात. मी मनाला सांगितलं – जरा थांब बाबा, प्रकरण काय आहे जरा कळू दे, असा पण जरा श्रियाचा विचार कर, काही झालं तरी पहिलं प्रेम तर तीच आहे( जी माझी कल्पनाच आहे अजून) !तशी लीना आईला बोलली काकू , लू ? आईला काही कळलं नाही, मीच पट्कन, थिस वे करत तिला बाथरूम पर्यंत नेलं, आणि माझा धुतलेला, न वावरलेल्या नॅपकिन कपाटातून काढून मुद्दाम कपाटाच दार उघड ठेवत, (आईला दाखवायला अर्थातच)बाथरूम बाहेर सिंक जवळ थांबलो, ती बाहेर येऊन नॅपकिन घेत थँक यू म्हणाली, मी गप बाहेर जाऊन मावशीला चहा घेणार का मावशी विचारत तिच्या बाजूला बसलो. ह्या आशेने कि लीना बाहेर आली की ह्या दोघींपैकी कोणी तरी माझी नीट ओळख करून देईल.

कसलं काय? लीना आली आणि मावशी लीनाला – तू चहा घेणार अामचा विकीर बनवतोय, विकीर अमृततुल्य. तश्या तिघी हसायला लागल्या. काही तरी जुना जोक आहे हे समजूम मी गप किचनमध्ये चहा बनवायला गेलो.

चहा वैगरे झाला, मावशी बोलली मी जरा अंग टाकते. आई लीना ला बोलली माझा रूम वापरायला. तशी ती माझ्या रूम मध्ये गेली. मी माझा फोन घ्यायला तिच्या मागे गेलो, तिने वाटत माझ्या बुल्लेटची चावी पाहिली होती. मी बाहेर जाताना तिने विचारलं, तुझ्याकडे बुलेट आहे? मी मान हलवत आणि हलकी स्माईल देत बाहेर आलो.

आई खूप दिवसांनी माहेरी आलेल्या मुली सारखी स्वतःचा किचन बघत होती. मी तिच्याजवळ गेलो, आम्ही दोघांनी हग केलं, नीट राहिलास ना बाळा. खायचे हाल झाले ना माझ्या पोराचे. आग आई मी मस्त होतो, तू सांग, तू एन्जॉय केलस ना? आमच्या मायलेकरांचा आसवांशिवायचा इमोशनल सिन सुरु होता. चहा मस्त झालेला विकीर. मी लगेच विचारलं- अमृततुल्यचा काय जोक आहे? आई- ते जाऊ दे , तू इकडे ये मी बघ टी- शर्ट आणलाय तुझ्यासाठी, आणि तिने हुडी काढून दाखवला, मी म्हंटल मस्त आहे पण ह्याला हुडी म्हणतात आई. आई- हा तेच काय लीना बोलत होती आवडेल त्याला. फोटो बघून कळलं तिला. जाम हुशार आहे ती.. बर हीच ती वेळ आहे ओळखून मी लगेच विचारलं- आई कोणेय ती?

आई अरे ती उद्या जाईल, तीच दिल्लीच फ्लाईट आहे उद्या रात्री. मी- मनातल्या मनात, म्हणजे एक दिवस ती आहे ती पूर्ण, मनाने कुठेतरी गुपचूप मनात ठेवलेला श्रियाचा फोटो आताच नीट केलेल्या कपाटाच्या कुठल्यातरी कप्प्यात लपवून ठेवला , आई- अरे फ्लाईट वरून आठवलं, काकांना न्यायला जाशील का एअरपोर्टला ?
मी- कपाट, हो हो जाईल ना , आई मी कपाट आवरलं, आई आणि माझ्या गप्पा चालू होत्या. माझी नजर आणि मन दोन्ही माझ्या बेडरूम बर सध्या कब्जा केलेल्या लिनाकडे होते. तिने मनावर हि कब्जा करावा असा वाटत होत…

सोफ्यावर ताणून देत मी लीना आणि विकीर च्या जोड-नावाचा विचार करू लागलो. साफ करीना सैफीना आहे तसं. एक दिवस होता पूर्ण, तिला इम्रेस करायला.

मनात शपथ घेतली आपल भब्रम्हचर्य मोडायचं. सिंगल लोंडाच बिरुद खोडायचं, हेतल आणि घंटा सारखं आपणही कोणाशी तरी हळूहळू, सगळंच सीक्रेट असल्यासारखं बोलायचं.

भीतीवर माझा फोटो होता, त्या फ्रेममध्ये मी मला, लीनाला आणि आमच्या बुलेटला इमॅजिन केलं होत.

तिला बाईक आवडते हे तर कळलं होत. बाईकचा मालक आवडेल का?
छातीवर हुडी घेत ठरवलं आज हि हुडी घालायची, तिचा चॉईस आहे ना, मी घातलेला तिला नक्की आवडेल…

आणि अस माझ्याही न कळत मी लीनाला पटवायची पहिली स्टॅटेर्गी आखली होती.

लीना को माँ कि बहू बनाओ मिशन !!!

                                                                          क्रमशः

 

                                                                                                      अविनाश ऊबाळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा