श्रीहरीकोटा, १८ नोव्हेंबर २०२२ : देशातील पहिले खाजगीरीत्या विकसित करण्यात आलेल्या ‘विक्रम-एस’ हे पहिले खासगी रॉकेट उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था श्रीहरिकोटा येथील केंद्रातून या रॉकेटचे आज प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपणामुळे भारतीय अवकाश क्षेत्र आज एका नवीन उंचीला स्पर्श करणार आहे.
देशाच्या अंतराळ उद्योगात अनेक दशकांपासून इस्त्रो या सरकारी संस्थेची मालकी असलेल्या क्षेत्रात या प्रक्षेपणाने खासगी क्षेत्राचा प्रवेश चिन्हांकित केला जाणार आहे. आज सकाळी ११.३० वाजता ‘विक्रम-एस’ या पहिल्या खासगी रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे. यापूर्वी हे रॉकेट १५ नोव्हेंबर रोजी लॉंच करण्याची योजना होती.
सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झाल्यानंतर ‘विक्रम-एस’ हे रॉकेट ८१ किमी उंचीवर पोचेल. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि दिवंगत शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटचे नाव ठेवण्यात आले आहे. भारतातील खासगी क्षेत्रासाठी ही मोठी झेप आहे. रॉकेट लॉंच करण्यासाठी अधिकृत असलेली पहिली भारतीय कंपनी आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर