मुंबई, २७ सप्टेंबर २०२२ : सैफ अली खान आणि ऋतिक रोशन यांचा बहुचर्चित चित्रपट विक्रम वेढा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. प्रदर्शनाआधीच हा चित्रपट चर्चेत आला आहे. त्याच्या ट्रेलरने प्रेक्षकांनी आकर्षित होऊन या चित्रपटाचे बुकिंग केले असल्याचे सिनेमा थिएटरवर दिसून येत आहे.
यात सैफ अली खान आणि ऋतिक रोशन यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ गाजवेल असा निर्मात्यांचा अंदाज आहे.
पण सध्या सैफ अली खानने ऋतिख रोशनचे माध्यमांमध्ये केलेले कौतुक गाजत आहे. ऋतिक रोशन हा अतिशय उंच आणि हॅण्डसम अभिनेता असल्याचं सैफ अली खानने सांगितलं. त्याने सांगितलं की, या चित्रपटात मला त्याच्याबरोबर काम करायला मिळालं आणि त्यामुळे त्याचा खरा अभिनय पाहता आला, ऋतिक रोशन हा अतिशय मेहनती आणि कॅमेऱ्याला आवडणारा चेहरा आहे. त्यामुळे त्याचे काम नक्कीच कौतुकास्पद असल्याचं सैफ अली खानने सांगितलं.
सिनेक्षेत्रात एकमेकांचे कौतुक करणारे आणि एकमेकांना प्रोत्साहित करणारे लोक फार कमी असतात. त्यातून जर ते प्रसिद्धीच्या शिखरावर असतील तर, अशा प्रकारची टिपणी पहायला मिळणं कायम दुर्मिळच. त्यामुळे सैफ अली खानने ऋतिक रोशनसारख्या अभिनेत्याचं कौतुक करणं, हे म्हणजे चेरी ऑन द केक म्हटंल्यास वावगं ठरणार नाही.
उच्च स्टारकास्ट आणि त्यांचे अभिनयाने परिपूर्ण सिनेमा ही रसिकांसाठी यंदा पर्वणीच ठरत आहे. ब्रह्मास्त्र आणि नंतर विक्रम वेढा यांने रसिकांचे मनोरंजन होणार हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस













































