विलास खोब्रागडे यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर.

19
Government Employee Award Vilas KhobragadeGovernment Employee Award Vilas Khobragade
विलास खोब्रागडे यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर.

Government Employee Award Vilas Khobragade Nagpur: ग्रामपंचायत बेला येथील ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे यांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सन २०२२-२०२३ या वर्षासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम प्रभावीपणे राबवताना त्यांनी दाखवलेले प्रशासकीय कौशल्य, अनुभव यामुळे त्यांना हे यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांतर्गत कार्बन नुट्रल विशेष पंचायत पुरस्कार, माझी वसुंधरा अभियान, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, आर. आर. आबा स्मार्ट ग्राम पुरस्कार, नमो आत्मनिर्भर भारत, पंचायत लर्निंग सेंटर, वन व्यवस्थापन अशा विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली.

हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची पावती असून ग्रामविकास क्षेत्रात काम करणाऱ्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरणारा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर