गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई विलेपार्ले येथे इमारतीला आग

विलेपार्ले येथे इमारतीला आग

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याचा बातम्या कानावर येत आहे अशीच एक घटना आज मुंबई मधील विलेपार्ले येथे घडली आहे. विलेपार्ले येथील एका इमारतीच्या सातव्या-आठव्या मजल्यावर आग लागली. ही आग सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लागली. ही खबर अग्निशामक दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे.

आग लागलेल्या या इमारतीचे नाव लाभ श्रीवल्ली असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा इमारतीत तिथे राहणारे काही रहिवाशी अडकले होते. मात्र अग्निशामक दलाने त्यांची सुखरूप सुटका केली. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इमारतीच्या आठव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये दुरुस्तीचं काम सुरु होतं. तेथे ही आग लागली आणि नंतर अन्य मजल्यावर पसरल्याची माहिती आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून आजुबाजुच्या इमारतींमधील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version