कर्जत तालुक्याचे ग्रामदैवत: भाजपचे घंटानाद आंदोलन

कर्जत, २९ ऑगस्ट २०२०: कर्जत येथे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरासमोर भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करत दार उघड उद्धवा दार उघड असे आवाहन राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांनी केले.
राज्यामध्ये कोरोनाचा कहर वाढलेला असताना राज्यामध्ये महाआघाडी सरकारने मंदिरे बंद ठेऊन मदिरालये सुरू करण्यात आली आहेत, मॉल उघडले आहेत रस्त्यावर गर्दी वाढली आहे मग फक्त मंदिरच बंद का? असा प्रश्न उपस्थित करत भाजपाने घंटानाद आंदोलन पुकारले असून कर्जत येथे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरा समोर भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करत दार उघड उद्धवा दार उघड असे आवाहन राज्याचे प्रदेशउपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी व भाविकांनी उपस्थित राहत  केले.

मंदिरावर अनेकांची रोजीरोटी अवलंबून आहे, त्यामुळे दार उघड उद्धवा दार उघड या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला जागे करण्याचे आवाहन केले. यावेळी ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज नेटके, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, यांनी मनोगते व्यक्त केली, तर माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी यावेळी बोलताना राज्य शासनावर जोरदार टीकास्त्र सोडले.
यावेळी शांतीलाल कोपनर, समनव्यक पप्पू शेठ धोदाड, सरचिटणीस सुनील काळे, सरपंच काकासाहेब धांडे, स्वप्निल देसाई, सुनील यादव, अमृत काळदाते, रामदास हजारे, ह. भ. प. राहुल पिंपळे, रसाळ महाराज, अनिल गदादे, सतीश समुद्र, हनु गावडे, आदीसह  ऊपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी केले. यावेळी प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते गोदड महाराजांची आरती करण्यात आली, तर पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

संत श्री गोदड महाराज मंदिराचे पुजारी काकडे परिवाराच्या वतीने प्राध्यापक राम शिंदे यांना निवेदन देऊन मंदिरे उघडण्याबाबत विनंती केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा