ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावी ठरेल – वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर

लोणी काळभोर ३० सप्टेंबर २०२०: लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बंडगर यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा ग्रामीण भागांमध्ये प्रभावी ठरेल, असा विश्वास लोणी काळभोर येथे आयोजित केलेल्या ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये व्यक्त केला.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक बंडगर यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व नागरिकांना ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरुन ग्रामीण भागामध्ये चोरी दरोड्याच्या घटना, महिला संदर्भातील गुन्हे, लहान मुले हरवणे, वाहन चोरी, गंभीर अपघात, पुर आपत्ती, वन्य प्राण्यांचा हल्ला, आग जळीताची घटना अशा आपत्तीच्या वेगवेगळ्या घटनांची ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे तातडीने मदतकार्य होते.

अशा घडणाऱ्या दुर्घटनांना आळा घालणे प्रभावीपणे शक्य होते. यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाने आपल्या साध्या किंवा अँनरॉईड मोबाईल मध्ये AAA -Help 18002703600 या नावाने नंबर सेव्ह करावा. ग्रामसुरक्षा यंत्रणेचे नियम व अटी 02248931236 या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा संकटप्रसंगी वापर करावा व पोलीस यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात विविध गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, पोलीस मित्र, तंटामुक्त अध्यक्ष उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रशिक्षण गणेश लोकरे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरिक्षक बोरकर यांनी केले. शिबिराबद्दलचे मनोगत पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रा. सुरेश वाळेकर व होळकरवाडी युवती सरपंच प्रज्ञा झांबरे यांनी व्यक्त केली. आभार बोरकर यांनी मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा