सिद्धटेक रस्त्यावरील विद्युत खांब काढण्याची ग्रामस्थांची मागणी.

सिध्दटेक, २८ जुलै २०२० : बारामती दौंड तालुक्यातील देऊळगावराजे येथील दौंड -सिद्धटेक रोडवर सुरु असलेल्या महामार्गावर विद्युत खांब असून यावर सध्या विद्युत वितरण कंपनीचा विद्युत प्रवाह सुरु आहे. हा खांब रस्त्याच्यावर कामात येत आहे.

याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी व विद्युत कंपनीला सांगून देखील विद्युत खांब रस्त्यामध्ये ठेवला आहे. परिणामी भविष्यात या विद्युत खांबामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. तेव्हा संबंधितांनी याकडे लक्ष घालून हा विद्युत खांब काढून टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

देऊळगावराजे (ता.दौंड)च्या पूर्व भागात अष्टविनायक महामार्गाचे काम करणारा मुजोर ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ठेकेदार धार्जिण्या धोरणामुळे देऊळगावराजे येथील नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.

देऊळगावराजे गावठाण हद्दीत अष्टविनायक रोडचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याचा बाजूने जाणाऱ्या विद्युत वाहक तारा रस्त्याच्या बाजूने जाणारे सांड पाण्याचे गटार इत्यादी हटविले नाही.

संबंधित बाबी वेळोवेळी  ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या निदर्शनास ग्रामपंचायत प्रशासनाने आणून दिल्या होत्या. तरीही ठेकेदाराने गावठाण हद्दीत काम सुरूच ठेवले होते. त्याचा परिणाम आज सकाळी विद्युत वाहक खांबाच्या कडेच्या एका खांबाचा ताण तुटल्याने रस्त्याचे काम सुरू असतानाच एक खांब अचानक रस्त्याच्या बाजूने झुकला. दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला. तर एका ठिकाणी मैलापाणी वाहून नेणारे गटार फुटल्याने ते पाणी लोकवस्तीतच वाहू लागले आहे. अशा प्रकारे नियोजनशून्य कामामुळे नागरिकांच्या आरोग्याला व जीविताला धोखा निर्माण झाला आहे.

त्यामळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर सक्त कारवाई करून रस्त्याच्या बाजूच्या विद्युत वाहक तारा सुरक्षित ठिकाणी हलविल्याशिवाय गावठाण हद्दीत रस्त्याचे काम न करण्यासंबंधीचे आदेश देण्याची मागणी ग्रामस्थानकडून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी