सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील २४ गावचे ग्रामस्थ कर्नाटकात जाण्यास इच्छुक

7

मंगळवेढा, सोलापूर ७ फेब्रुवारी २०२४ : सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील २४ गावचे ग्रामस्थ कर्नाटकात जाण्यास इच्छुक असुन त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची वेळ मागितली आहे. या गावातील लोकांनी आता थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याने खळबळ उडाली आहे. हे ग्रामस्थ पिण्यासाठी आणी शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने वैतागले आहेत. येणा-या उन्हाळ्याचे चटके आताच बसू लागल्याने लोकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

२४ गावांमधील ग्रामस्थांनी येणा-या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचार केला आहे, याचा धसका लोकप्रतिनिधीनी घेतलाय. मंगळवेढ्याचे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी कोणालाही कर्नाटक जायची गरज पडणार नसून, महाराष्ट्र न्याय देईल अशी समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता संतप्त झालेल्या या २४ गावातील शेतकरी आणि पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. महाराष्ट्र स्वातंत्र्य होऊन ६४ वर्षे झाली तरी, महाराष्ट्र आम्हाला साधे पाणी देऊ शकत नसेल तर आम्ही कर्नाटकात जाणार” अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : दगडु कांबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा