नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२०: मागील बुधवारी कंगना राणावत मुंबईला येत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुरक्षित शाररिक अंतराच्या निकषांचे उल्लंघन करत विमानात छायाचित्रण करताना गोंधळ घातला होता. त्यावेळेस डीजीसीएने विमानात छायाचित्रण करण्यास बंदी घातली होती.
मात्र रविवारी नागरी उड्डयन महासंचालनालयाने जारी केलेल्या नवीन दिशा निर्देशात प्रवासी विमानात छायाचित्रण करू शकतील, पण संरक्षण दलाच्या वायूतळांवर छायाचित्रण न करण्याची अपवादात्मक बंदी कायम राहील असे म्हटले आहे.
विमानात छायाचित्रण करताना गोंधळ घालायचा नाही अशी तंबी देखील डीजीसीएने प्रवाशांना दिली असून, हवाई सुरक्षेला धोकादायक ठरणारी रेकॉर्डिंगची उपकरणे वापरता येणार नाही असेही डीजीसीएने म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी