विमानातील जागेवरून प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या गोंधळ

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. साध्वी प्रज्ञा दिल्लीहून भोपाळला जात असताना साध्वी प्रज्ञा दुसऱ्या प्रवाशाच्या सीटवर बसल्या होत्या. त्यामुळे वाद निर्माण झाला. या सगळ्या गोंधळामुळे हे विमान सुटायला पाऊणतास उशीर झाला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांच्या दिल्ली ते भोपालच्या प्रवासासाठी A-1 ही सीट बुक केली होती. मात्र स्पाईस जेटच्या नियमांनुसार व्हिलचेयरवर असलेल्या व्यक्तिंना सुरक्षेच्या कारणास्तव A-1 ही सीट दिली जाऊ शकत नाही. ज्यामुळे त्यांना A-2 ही सीट देण्यात आली होती. या गोष्टीवरून प्रज्ञा ठाकूर यांनी क्रू मेंबरला नियम पुस्तक दाखवण्यास सांगितले. त्याशिवाय विमानातून उतरण्यास नकार दिला. यांच्या या वादामुळे ५० प्रवासी ताटतळले होते.
दिल्ली ते भोपाल प्रवास करताना विमानात क्रू मेंबरसोबत त्यांचा वादही झाला. ज्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. हा वाद चालू असताना विमानाला उड्डाण करायला ४५ मिनीटांचा उशीर झाला. ज्यामुळे इतर प्रवाशी हे संतप्त झाले. तर एका व्यक्तिने प्रज्ञा ठाकूर यांच्याशी वाद देखील घातला. ‘जरा तरी लाज बाळगा’ असा हा प्रवाशी व्हिडिओमध्ये प्रज्ञा ठाकूर यांना बोलताना दिसत आहे. प्रज्ञा ठाकूर यांचे असे वागणे पाहून नेटकरी संतप्त झाले आहेत आणि त्यांनी हा व्हिडिओ पाहून प्रज्ञाशी वाद घालणाऱ्या प्रवाशाला पाठिंबा दिला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा